गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. सत्ताधारी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळेच गुजरातमधील सत्ता टिकविण्यासाठी भाजप पंतप्रधान मोदींच्या करिश्म्याचा आधार घेणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी राज्यात 50 हून अधिक प्रचार सभा घेणार आहेत, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
मोदी दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, कच्छ आणि मध्य गुजरातमध्ये 50 ते 70 प्रचार सभा घेऊ शकतात. 10 नोव्हेंबरनंतर दोन ते तीन प्रचारसभांपासून मोदी आपल्या ’गुजरात मिशन’ची सुरुवात करणार आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews